Sunday, April 26, 2009

मातीचेच पाय

श्रद्धा, भक्ती, आत्मीयता, विश्वासाचा अर्थ काय?
जिथे माथा टेकवावा तिथे मातीचेच पाय!


मंदिराची शोभा न्यारी, मूर्ती मात्र भंगलेली
वैभवाची ऐट हंड्या झुम्बरात टांगलेली
देवाच्याच दारी होई देवाचाही निरुपाय


मांगल्याची, पावित्र्याची चंद्रभागा का आटली?
सुकला स्तब्ध अश्वत्थ, इंद्रायणीही गोठली
पापभार सांभाळून झिजले देवाचे पाय


किती, कशी जोजवावी माया ममतेची नाती ?
त्याग राहिला गहाण लालची स्वार्थाच्या हाती
कधी देव, कधी दैव, सारे थकले उपाय

1 comment:

  1. सुंदर!

    "किती, कशी जोजवावी माया ममतेची नाती ?
    त्याग राहिला गहाण लालची स्वार्थाच्या हाती"

    उत्कट!

    ReplyDelete