Thursday, June 4, 2009

आकांत

प्राण झाला शांत आता
संपला आकांत आता

यायचे ना फिरुन येथे,
सोडला हा प्रांत आता

तोडले सारेच धागे,
का पडावी भ्रांत आता?

सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता

सोहळे सोसून फसवे
जीव झाला क्लांत आता

वादळाचे धुमसणे हे
का न होई शांत आता?

3 comments:

  1. owow

    really great

    i love it

    keep in touch

    ReplyDelete
  2. शांत, आकांत, प्रांत, भ्रांत, एकांत, क्लांत...सुंदर शब्द वापरले आहेत.

    ReplyDelete
  3. सावल्यांच्या संगतीने
    बोलतो एकांत आता

    ReplyDelete