Sunday, July 5, 2009

दान

मी दिवस मोजते सरते
पण जगणे मात्र विसरते

तू इतरांसाठी झटसी,
मी माझ्यापुरती उरते

कितिही तू दिले तरीही
ते मला कसे ना पुरते ?

जे मला न मागुन मिळते
तितक्याने मन ना भरते

का हाव ? कशी अतृप्ती ?
मिळुनही सर्व मी झुरते

तू देउन विसरून जाशी,
मी घेउन दान विसरते

1 comment:

  1. >>का हाव ? कशी अतृप्ती ?
    >>मिळुनही सर्व मी झुरते
    >>तू देउन विसरून जाशी,
    >>मी घेउन दान विसरते

    हे अगदी १००% जुळतं.

    ReplyDelete