Tuesday, January 26, 2010

अंगाई



नीज आली, पेंगलेले नेत्र झाकी श्रीहरी
सानुलीशी झाकलेली मूठ चाखी श्रीहरी

या मुठीतुन काय झरते अमृताची धार रे?
गीत सृजनाचे तुझे हे कोवळे हुंकार रे
रुणुझुणू या घाग-यांचा नाद रोखी श्रीहरी

गोड अंगाई तुला ही रातराणी ऐकवी
              मंद हिंदोळ्यात बाळा चंद्र हलके जोजवी            
अजुनि तुझिया लोचनी का जाग बाकी श्रीहरी?

ओठ इवले मुडपुनी का रुससि लटके तान्हुल्या?
खुदुखुदू हससी क्षणातच, चांदण्या जणु सांडल्या!
साद देती का तुला रे स्वप्नपाखी श्रीहरी?

3 comments:

  1. sunder....

    नीज आली, पेंगलेले नेत्र झाकी श्रीहरी
    सानुलीशी झाकलेली मूठ चाखी श्रीहरी

    dolya sammor chitra ubhe raahile :)

    ReplyDelete
  2. "गीत सृजनाचे तुझे हे कोवळे हुंकार रे"
    ...... अतिशय सुंदर कल्पना

    "ओठ इवले मुडपुनी का रुससि लटके तान्हुल्या?
    खुदुखुदू हससी क्षणातच, चांदण्या जणु सांडल्या!"

    गोंडस, गोजिरवाणं, निरागस बाळ डोळ्यासमोर
    आल या ओळी वाचल्यावर.... खूप छान.

    ReplyDelete