Sunday, February 7, 2010

धोका

हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका

बंद केली मी सुखाची सर्व दारे,
अन्‌ घराला एकही नाही झरोका

हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

6 comments:

 1. अप्रतिम!
  सोबती काळोखगर्भाचा उबारा,
  आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका... वा! क्या बात है!

  ReplyDelete
 2. खूप सुंदर क्रांती! मलाही याच दोन ओळी जास्त आवडल्या.

  ReplyDelete
 3. गज़ल आवडली.
  "एकही नाही घराला या झरोका"
  ही ओळ
  'या घराला एकही नाही झरोका'
  अशी लिहिल्यास अधिक प्रवाही होईल असे वाटते. तसेच 'या घराला...' ऐवजी 'अन्‌ घराला एकही नाही झरोका' म्हटल्यास शेर अधिक अर्थवाही होईल.

  ReplyDelete
 4. धन्यवाद मिलिंद. सुचवलेला बदल आवडला, आणि केलाही.

  ReplyDelete
 5. अप्रतिम गझल.
  सर्वच द्वीपदी चांगल्या.
  खूप आवडली.

  ReplyDelete
 6. बंद केली मी सुखाची सर्व दारे,
  अन्‌ घराला एकही नाही झरोका
  like it!!!

  ReplyDelete