Wednesday, July 28, 2010

माझी जन्माची शिदोरी

तुझ्या श्वासांचा विळखा
तुझ्या नजरेची मिठी
तुला पाहता लाजून
झुके पावलांशी दिठी

तुझे मौनही बोलके,
गूज डोळ्यांनी सांगते
भाव जाणून त्यातले
गीत मनात रंगते

दुराव्यात जवळीक
जपणारी तुझी प्रीत
तिचा अनाहत नाद,
तिचे स्वर्गीय संगीत

तिची अवीट माधुरी
स्वप्न जागवी बिलोरी
तुझी क्षणांची संगत
माझी जन्माची शिदोरी

3 comments:

  1. सहज म्हणून विचारते - यमक असणा-या ओळी जास्त का तालबद्ध वाटतात? असे मलाच वाटते की सगळयांना वाटते- हे अर्थातच मला माहिती नाही. ’व्यक्ती तितक्या प्रकृती’ हेच याचे कदाचित उत्तर असेल.

    ReplyDelete
  2. तिची अवीट माधुरी
    स्वप्न जागवी बिलोरी
    तुझी क्षणांची संगत
    माझी जन्माची शिदोरी
    सुंदर कविता
    सुरेखच जमलीय.

    ReplyDelete
  3. ‘अग्निसखा’ च्या कविता
    काव्यानंदाची शिदोरी

    ReplyDelete