Monday, August 23, 2010

बंडखोरी

रुढींची भिंत त्याने पाडली
मनाची बंडखोरी वाढली

उरे माझे अभागी झोपडे
पुरी वस्ती जरी ओसाडली

चला, बोली करा, भगवंत घ्या
इथे श्रद्धा विकाया काढली

जरासे स्वच्छ, हलके वाटले,
मनाची ओसरी मी झाडली

जगाचे ऐकले अन् वागले,
तरी तोंडे किती वेंगाडली!

व्यथे, आता तरी तू हो सुखी,
तुझ्यासाठी सुखे लाथाडली

विठू, दे घोंगडी, आताच मी
कुडीची जीर्ण चादर फाडली

3 comments:

  1. सहिये....आवडली...!!!

    ReplyDelete
  2. क्रान्ति, अगं किती वेगवेगळ्या व्यथांचे अन त्यांनी दिलेल्या क्षतांचे भाव घेऊन आलीय ही बंडखोरी. शेवटच्या दोन ओळी... या सार्‍यावर कडीच आहेत. अप्रतिम!

    ReplyDelete
  3. वा, सुंदर!
    विशेषतः
    >विठू, दे घोंगडी, आताच मी
    >कुडीची जीर्ण चादर फाडली

    ReplyDelete