Thursday, September 2, 2010

ग्रहण

जाळ नाही, धूर नाही, तरी काहीतरी जळतंय
एकूण एक हिरवं पान पिकल्यासारखं गळतंय
काय चुकलं, कळत नाही, इतकं मात्र कळतंय, ..... की
नको त्याच वाटेवर चाललंय भ्रमण!

कधी असं, कधी तसं, वाट्टेल तसं वागलंय,
स्वप्नांमागे धावून धावून मन थकलंय, भागलंय
कोण जाणे, याला कसलं भलतं खूळ लागलंय, ..... की
पिसाटल्या कल्पनांचं झालंय अतिक्रमण?

डोळ्यांच्या डोहातलं पाणी कसं आटतंय?
काळजाच्या आभाळात गच्च धुकं दाटतंय
राहून राहून जिवाला या असं काही वाटतंय, ..... की
आपलंच का आपल्याला लागलंय ग्रहण?

4 comments:

  1. सुंदर.. फारच अप्रतिम !!!!

    शेवटचं कडवं खूप आवडलं !!

    ReplyDelete
  2. राहून राहून जिवाला या असं काही वाटतंय, ..... की
    आपलंच का आपल्याला लागलंय ग्रहण?
    वा, अति सुंदर, क्रांति, खूपच आवडली कविता.

    ReplyDelete
  3. काळजाच्या आभाळात गच्च धुकं दाटतंय
    राहून राहून जिवाला या असं काही वाटतंय, ..... की
    आपलंच का आपल्याला लागलंय ग्रहण?

    जबरदस्त !
    आणखी अभिप्राय .... शक्य नाही..... बोलतीच बंद !
    hats off

    ReplyDelete
  4. राहून राहून जिवाला या असं काही वाटतंय, ..... की
    आपलंच का आपल्याला ग्रहण लागलंय?
    वाटतंय खरं असंच...खूप छान....

    ReplyDelete