Saturday, November 13, 2010

त्रिधारा - स्वप्न

* स्वप्न खुळे डोळ्यांतच थिजले
पापणीस ना नीज जराशी,
थकून भागुन स्वप्नच निजले!

* तुझे स्वप्न चंचल पार्‍याचे
क्षणात दिसते, क्षणात लपते
भिरभिरणारे घर वार्‍याचे

* स्वप्न पाहणे राहून गेले
काजळकाळे काठ भिजवुनी
आसवांसवे वाहून गेले!

* आतुर मनाला स्वप्नाची चाहूल
सांजेपासूनच डोकावे दारात,
कधी अंगणात वाजेल पाऊल?

* काचेचं स्वप्न, ते टोचेलच ना?
डोळ्यांतून पडलं, खळ्ळकन फुटलं,
काळजाला तुकडा बोचेलच ना?

1 comment:

  1. प्रत्येक त्रिधारेमधे स्वप्न या मध्यवर्ती कल्पनेवर एक वेगळा विचार आहे, असं मला वाट्लं. छान आहे.

    ReplyDelete