Tuesday, January 31, 2012

जाता जाता

एक गुन्हा नक्कीच करावा जाता जाता
हात तुझा हातात धरावा जाता जाता 

ही फसवी चाहूल सुखाची ठायीठायी,
भास खुळा हा सत्य ठरावा जाता जाता

सुन्न, रिकामा पोकळ वेळू आयुष्याचा
आज तरी तू सूर भरावा जाता जाता

जन्म सरे ज्याच्या फुलण्याच्या ध्यासापायी
तो हिरवा चाफा बहरावा जाता जाता

शेवटचा लावून दिवा गंगेच्या काठी
त्याच प्रवाही प्राण झरावा जाता जाता

मी सरणाच्या आधिन होता माझ्यामागे
एक उसासा फक्त उरावा जाता जाता


8 comments:

  1. wah...! purn gazal ek vegalach anubhav devun jate.. shevatacha sher awesome...

    ReplyDelete
  2. मी सरणाच्या आधिन होता माझ्यामागे
    एक उसासा फक्त उरावा जाता जाता

    apratim

    ReplyDelete
  3. खूप सुंदर. अभिनंदन.

    ReplyDelete
  4. धन्यवाद मित्रांनो!

    ReplyDelete
  5. kya baat hai tai... punha punha yeun vachato ho kavita.... ulti ahe....

    sunna rikama velu ayushyacha...

    ReplyDelete
  6. सुंदर गझल.
    "जन्म सरे ज्याच्या फुलण्याच्या ध्यासापायी
    तो हिरवा चाफा बहरावा जाता जाता"
    .... हा एकदम कातिल शेर

    ReplyDelete