Friday, February 3, 2012

जलतरंग

पुसट पुसट सांध्यरंग
मन अवखळ स्मृतित दंग
अधिर, मदिर, मधुर हवा
उठवि अंतरी तरंग

स्वर घुमती, रुणझुणती
तरल गीत गुणगुणती
चंचल मनि किणकिणती
स्वप्नांचे जलतरंग 

4 comments:

 1. छान आहे. या निमित्ताने ’आठोळी’ हा प्रकार समजला.

  ReplyDelete
 2. छान आहे, पण आठोळी म्हणजे नक्की काय?

  ReplyDelete
  Replies
  1. मोहना, आठोळी म्हणजे आठ ओळींची कविता. जशी चारोळी म्हणजे चार ओळींची, तशी आठोळी आठ ओळींची.

   Delete
 3. "स्वप्नांचे जलतरंग ... " खुप छान रूपक आहे ...

  ReplyDelete