Sunday, September 16, 2012

हल्ली

सुचते-रुचते इतके भलते-सलते हल्ली 
कळले नसते तरिही सगळे वळते हल्ली

जखमा सजल्या, फुलल्या, खुलल्या, कविता झाल्या
कविता लिहिण्याकरिता जखमा जपते हल्ली

विसरू शकते चुटकीसरशी सगळी दु:खे,
रडता रडता फसवे हसणे जमते हल्ली

दुखणे असते परके पण मी म्हणते माझे,
भुलते मरणा, तरिही उपरे जगते हल्ली

खिडकीमधली चिमणी उडता उडता म्हणते,
'नुसता इमला म्हणजे घरटे असते हल्ली'

3 comments:

  1. जखमा सजल्या, फुलल्या, खुलल्या, कविता झाल्या
    कविता लिहिण्याकरिता जखमा जपते हल्ली

    >> vvaahh!! :)

    ReplyDelete
  2. कविता लिहिण्याकरिता जखमा जपते हल्ली

    sundar

    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete