Friday, February 5, 2010

चांदण्यादंवाचं अत्तर सांडून विझल्या
पहाटे पहाटे चांदण्या निजल्या

सांज कलताना एकेक चांदणी
हळू उतरली रात्रीच्या अंगणी
लुकलुकताना गालात हासल्या

चंद्र पुनवेचा उतरे पाण्यात
मालकौंस जसा सुरेल गाण्यात
सुरांच्या धारांत सचैल भिजल्या

रात्रीने सांडल्या माळता माळता
वेलींत लपल्या कळ्यांशी खेळता
सावळ्या भुईने पदरी वेचल्या2 comments:

 1. कविता छान आहे. पण चांदण्यांच्या कवितेत दुसर्‍या कडव्यात चंद्राचा उल्लेख सहज़ बसलेला नाही, आणि मालकंसाचा उल्लेख तर अगदीच कृत्रिम आहे. मालकंस गाण्यात 'उतरत' नाही, आणि चंद्रासारखा तर तो अजिबातच वागत नाही, असं मला वाटतं.

  तुमची मागची कविताही चांगली होती, पण पहिल्या दोन्ही ओळीत

  नीज आली, पेंगलेले नेत्र झाकी श्रीहरी
  सानुलीशी झाकलेली मूठ चाखी श्रीहरी

  'श्रीहरी' शब्दाचीच री न ओढता 'वैखरी', 'माधुरी', 'पंढरी' असला काही बदल जास्त चांगला वाटला असता.

  ReplyDelete
 2. क्रांती, मला पहिल्या दोन ओळी खूपच आवडल्या.

  ReplyDelete