Sunday, April 11, 2010

मात्रा

मनाची अता थांबली काहिली
विषाला विषाचीच मात्रा दिली!

कुठे लोपले कालचे हासणे?
कुठे ती तुझी आज जिंदादिली?

कुणी जाणल्या का नभाच्या व्यथा?
कुणी मातिची यातना पाहिली?

सुखाचा तिथे घोष होईल का?
जिथे वेदनेचीच संथा दिली!

दुभंगून घे माय पोटी अता,
उभा जन्म मी वंचना साहिली

1 comment:

  1. कविता तर चांगली आहेच; शिवाय सौदामिनी वर्णिक छन्दातली मी वाचलेली ही पहिलीच कविता, त्यामुळे जास्तच मजा आली.

    ReplyDelete