Friday, January 1, 2010

चंद्र खुणावतोपुन्हा पौर्णिमेचा चंद्र खुणावतो
पुन्हा तेच भास, जीव नादावतो,
पुन्हा चांदण्यांचा रासरंग दारी,
पुन्हा श्वासातला गंध वेडावतो

पुन्हा सांज होते आतुर, कातर
पुन्हा मनामध्ये स्मृतींचा जागर
जसा भरतीच्या लाटांनी सागर
उफाळून आकाशात झेपावतो

पुन्हा तेच स्वप्न जागते लोचनी
हुरहूर तीच भांबावल्या मनी,
धुंद निशिगंध रात्रीच्या अंगणी
चांदणे पेरून मला बोलावतो

पुन्हा जीव गुंतलेला त्या क्षणांत,
सूर बासरीचे घुमती प्राणांत
पुन्हा पुन्हा माझ्या मनदर्पणात
सजण होऊन चंद्र डोकावतो

2 comments:

  1. पुन्हा सांज होते आतुर, कातर
    पुन्हा मनामध्ये स्मृतींचा जागर...
    Really liked it.
    खूप छान कविता आहे..

    ReplyDelete