Sunday, February 28, 2010

काव्य जगावे

हा माझा पहिलाच नवा प्रयत्न. सुप्रसिद्ध उर्दू कवी क़तिल शिफाई यांच्या 'अपने होटोंपर सजाना चाहता हूं' या गझलचा स्वैर भावानुवाद.


ओठांवरती तुज सजवावे
गीतापरि गुणगुणत रहावे

लाभावा तव पदर आसवां,
त्या थेंबांचे मोती व्हावे

या विश्वाचे तम मिटवाया,
मी माझे घरटे जाळावे

तुला पुरेसे स्मरून झाले,
अता तरी तू मला स्मरावे

तुझ्या मिठीतच श्वास विरावा,
मरणानेही काव्य जगावे

आणि ही मूळ गझल ::::::::

अपने होटोंपर सजाना चाहता हूं
आ, तुझे मैं गुनगुनाना चाहता हूं

कोई आंसू तेरे दामन पे गिराके,
बूंद को मोती बनाना चाहता हूं

छा रहा है सारी बस्ती में अंधेरा,
रोशनी को घर जलाना चाहता हूं

थक गया हूं करते करते याद तुझको,
अब तुझे मैं याद आना चाहता हूं

आखरी हिचकी तेरे जानों पे आए,
मौत भी मैं शाइराना चाहता हूं

6 comments:

 1. Chaan lihilas kranti...
  Farach sundar

  Keep it up
  Shantanu
  http://maplechipaane.blogspot.com
  http://manik-moti.blogspot.com

  ReplyDelete
 2. प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट.

  सहसा भाषांतरात आशय व्यवस्थित पकडायला ज़ास्त मात्रांचा पसरटपणा अवलंबावा लागतो. पण तुम्ही कमी मात्रांत परिणाम साधला आहे. शिवाय हिन्दी-उर्दुतली सगळीच आधुनिक कविता मला प्रचारकी थाटाची वाटते. त्यापेक्षा मराठीत तीच भावना तुमच्या शब्दांत जास्त प्रामाणिकपणे व्यक्त झाली आहे.

  ReplyDelete
 3. छान झाला आहे भावानुवाद..

  ReplyDelete
 4. पुन्हा वाटते कि तुला गुणगुणावे
  तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे
  ही शेखर सानेकारची गझल यावरून बेतली माहित होते
  आपला हा भावानुवाद तितकाच आवडला
  keep it up

  ReplyDelete
 5. पुन्हा वाटते कि तुला गुणगुणावे
  तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे
  ही शेखर सानेकारची गझल यावरून बेतली माहित होते
  आपला हा भावानुवाद तितकाच आवडला
  keep it up

  ReplyDelete