Thursday, June 10, 2010

नको तेच झाले

पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही

जरा बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही

किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे
उखाणेच झाले; असेही, तसेही

मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही

फुका बोलबाला ऋतूपालटाचा,
उन्हाळेच झाले; असेही, तसेही

कशाला निमित्ते हवी भेटण्याची?
दुरावेच झाले; असेही, तसेही

मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही

9 comments:

 1. खुपच छान..

  शेवट मस्तच..

  ReplyDelete
 2. Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com

  ReplyDelete
 3. faar chaan ...

  मुके राहणेही विरोधात माझ्या,
  पुरावेच झाले; असेही, तसेही

  ha sher aawadala

  ReplyDelete
 4. मस्त...!!
  कितीतरी दिवसांनी भेट दिली, आणि एक छान कविता वाचायला मिळाली!
  It was worth reading...
  पुलेशु.
  - अजिंक्य.

  ReplyDelete
 5. मुके राहणेही विरोधात माझ्या,
  पुरावेच झाले; असेही, तसेही

  kya baat hai!!!

  ReplyDelete
 6. तरीही जग चालले
  असेही, तसेही।

  काय सुंदर कवीता लिहली आहे.

  ReplyDelete