पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही
जरा बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही
किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे
उखाणेच झाले; असेही, तसेही
मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही
फुका बोलबाला ऋतूपालटाचा,
उन्हाळेच झाले; असेही, तसेही
कशाला निमित्ते हवी भेटण्याची?
दुरावेच झाले; असेही, तसेही
मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही
खुपच छान..
ReplyDeleteशेवट मस्तच..
Lovely!!!!!!!!
ReplyDeleteमस्तच...
ReplyDeletefaar chaan ...
ReplyDeleteमुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही
ha sher aawadala
मस्त...!!
ReplyDeleteकितीतरी दिवसांनी भेट दिली, आणि एक छान कविता वाचायला मिळाली!
It was worth reading...
पुलेशु.
- अजिंक्य.
मुके राहणेही विरोधात माझ्या,
ReplyDeleteपुरावेच झाले; असेही, तसेही
kya baat hai!!!
तरीही जग चालले
ReplyDeleteअसेही, तसेही।
काय सुंदर कवीता लिहली आहे.
Nitaant sunder gazal lihili aahes tu....
ReplyDelete