Tuesday, September 4, 2012

साहित्यिका

भाबडी-भोळी, तिला ना जाण साहित्यातली 
जिंकते संमेलने पण नित्य आयुष्यातली 

वाचली नाही तिने कुठली कथा-कादंबरी
भोवतीच्या व्यक्तिरेखा मात्र जपते अंतरी

ऐकते श्रुतिका न किंवा मालिका ती पाहते
भूमिका वाट्यास येती, त्याच खुलवित राहते

जाणते पोथ्या-पुराणे की न गाथा तत्वता
साधते जन्मांतरी पण सुफळता-संपूर्णता

गीत, कविता वा गझल सारेच जगते बावरी
अन बहर फुलवीत जाते काफिये हुकले तरी 

3 comments:

  1. गीत कविता अन् गझल सारेच जगते बावरी
    अन् बहर फुलवीत जाते काफिये हुकले तरी ।

    फारच सुंदर ।

    ReplyDelete
  2. अप्रतिम गझल

    ReplyDelete