Saturday, February 9, 2013

अब्जाधीश

घावांना सोसून घडेनच नक्की
माझ्यासाठी मी बहरेनच नक्की

चंदन आहे, झिजते अन् दरवळते
गंधाच्या रूपात उरेनच नक्की

या जन्मी जगण्याचे नाटक केले,
पुढल्या जन्मी मात्र जगेनच नक्की !

उल्का होणे माझे प्राक्तन नाही
अढळपदाला पात्र ठरेनच नक्की

आहे जरि तर्काच्याही पलिकडली,
आज-उद्या मी मला कळेनच नक्की !

सव्वा लाख मुठीतच झाकत आले,
आता अब्जाधीश असेनच नक्की !

No comments:

Post a Comment