येते मनात ते का सारे घडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये
वाटा नव्या जगाच्या हाकारती मला,
पाऊल टाकले ते जागी अडू नये!
पाऊल टाकले ते जागी अडू नये!
आनंदसोहळ्याला हे दार वर्ज्य का?
का नौबती सुखाच्या येथे झडू नये?
का नौबती सुखाच्या येथे झडू नये?
गालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!
त्याच्याविना जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू नये
माझ्याशिवाय त्याचे काही अडू नये
काट्यांत गुंतला ना, निष्पाप, भाबडा?
जीवास काय ठावे, कोठे जडू नये?
जीवास काय ठावे, कोठे जडू नये?
आजन्म जीवनाचा मी शोध घेतला,
हे दैवजात होते, ते सापडू नये!
हे दैवजात होते, ते सापडू नये!
सुरेख, गज़ल आवडली!!
ReplyDeleteगालास तीट काळी, आसू तसे हवे,
वाहून जन्म जावा, इतके रडू नये!>>>>>> अगदी खरे आहे!
गालास तीळ काळा, हासू तसे हवे,
राहून जन्म जावा, इतके हसू नये!
"काट्यांत गुंतला ना, निष्पाप, भाबडा?
ReplyDeleteजीवास काय ठावे, कोठे जडू नये?"
...... सुंदर
गज़ल आवडली
ReplyDeleteत्याच्याविना जरी मी आहे अनोळखी,
माझ्याशिवाय त्याचे काही अडू नये.
माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/