Friday, November 6, 2009

कोडी

प्रत्येक वादळाला केली बहाल होडी
तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी


साधे, सपाट रस्ते नव्हतेच या दिशेला
आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला
पायांत शृंखला अन् वाटाहि नागमोडी

एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी
वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी
अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!"

मौनात राहण्याने नुकसान फार केले
जाणून आपल्यांनी पाठीत वार केले
माया अजून उरली का काळजात थोडी?

या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते?
जावे जिथे, तिथे का गुंत्यात पाय होते?
मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!

5 comments:

 1. क्रान्ति किती अचूक मांडलेस.... मौनात राहण्याने नुकसान फार केले
  जाणून आपल्यांनी पाठीत वार केले तरिही माया अजून्ही उरलीच आहे माझ्या काळजात... सारे कसे माझेच आपले तरळून गेले गं.
  हे असे गुंते आणि ते आपलेच आहेत म्हणून अडकलेले आपले पाय....सहीच....आपण भेटूयाच गं...:)

  ReplyDelete
 2. मस्तच!
  या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते?
  जावे जिथे, तिथे का गुंत्यात पाय होते?
  मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!
  हे तर खूपच आवडलं.
  असंच लिहीत राहा.
  तुझ्या कवितांचा एक वाचक,
  अजिंक्य.

  ReplyDelete
 3. मौनात राहण्याने नुकसान फार केले
  जाणून आपल्यांनी पाठीत वार केले
  माया अजून उरली का काळजात थोडी?


  faarach chhhann

  tumachya gazala far bharee asatat...

  ReplyDelete
 4. फार सुंदर.
  "साधे, सपाट रस्ते नव्हतेच या दिशेला
  आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला "
  - क्या बात है!

  ReplyDelete