किती, कसे उपकार तुझे मानू मी अनंता?
सृजनाचा कल्पवृक्ष मला दिला भगवंता!
असो भले की वाईट, इथे जे काहीही होते,
तुझ्या इच्छेने, आज्ञेने, तुझ्या मर्जीने ते होते
माझ्या चुका, तुझी क्षमा; माझी हाव, तुझे देणे,
तुझी आभाळसाउली माझ्यासाठी भाग्यलेणे
तुझ्या अगाध लीलांना नाही आदि, नाही अंत
तूच सखा, पाठीराखा, मला कशाची रे खंत?
नाही माघार घेणार, येवो वादळे कितीही,
संकटांचे भय नाही, झुंजण्याचे बळ देई!
कृतज्ञता भावली गं क्रान्ति.
ReplyDeleteहो, तशी त्या अनंताची कृपा असते म्हणून बळ मिळते.. कधीकधी आपल्याला आश्चर्य वाटावे इतके!
ReplyDeleteसुरेख
ReplyDelete