Friday, August 27, 2010

जमले नाही

सागरात राहून मनाच्या झळा विझवणे जमले नाही
कुंपणातले खिळे काढले, खुणा बुजवणे जमले नाही
सूर्य, चंद्र अन तारे होते,
ऊन, सावली, वारे होते
आयुष्याचे इवले घरकुल जरा सजवणे जमले नाही
आसुसलेली ओली माती
कुशीत जपते हिरवी नाती
कोंब कोवळे तरी जळाले, तुला रुजवणे जमले नाही
जरी युगांची तहान होती,
ओंजळ माझी लहान होती
बरसलास अवघ्या विश्वावर, मला भिजवणे जमले नाही

5 comments:

  1. जरी युगांची तहान होती,
    ओंजळ माझी लहान होती
    बरसलास अवघ्या विश्वावर, मला भिजवणे जमले नाही


    faarch chhan..

    ReplyDelete
  2. "पाऊस-कविता" या खेळात खो दिलाय बघ तुला.
    http://pumanohar.blogspot.com/2010/08/blog-post.html

    ReplyDelete
  3. "जरी युगांची तहान होती,
    ओंजळ माझी लहान होती
    बरसलास अवघ्या विश्वावर, मला भिजवणे जमले नाही"

    तुमच्या कवितांमधल्या शेवटच्या ओळी,
    कवितेची उंची आणखी वाढवतात.
    या ओळी देखील तशाच...... खूप प्रभावी.

    ReplyDelete