Thursday, August 19, 2010

समिकरणे

उणे अधिक का उणे? न कळली ही समिकरणे
गुणिले सुख, भागिले दु:ख, उरली मग स्मरणे

बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते
बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे!

दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी?
सुख मोजाया कुठली वजने अन उपकरणे?

जगण्यासाठी मला आणखी काय हवे रे?
तुझे ध्यास, आभास, श्वास माळून विहरणे

म्हणे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी
अधोरेखिते, विरामचिन्हे अन अवतरणे!)

4 comments:

  1. सुंदर...

    http://my-abstractlife.blogspot.com/2010/08/blog-post.html
    ही गझल तांत्रिकदृष्टया बरोबर आहे का, आपल्या अभिप्रायाची वाट पाहत आहे

    ReplyDelete
  2. आहा...सुंदर
    गझल आवडली

    ReplyDelete
  3. म्ह्णे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी
    अधोरेखिते, विरामचिन्हे अन अवतरणे!)...the best

    ReplyDelete