जातात वृक्ष वादळात, तरती पाती,
आभाळ पेल तू, नकोस विसरू माती
प्रत्येक पावलागणिक बेट काट्यांचे,
माझीच पैंजणे दगा देउनी जाती
केव्हाच सोडली माझी वाट दिव्यांनी,
अंधार एकला जन्माचा सांगाती
पाने निखळावी जुन्या डायरीमधली,
निखळली, विखुरली तशी बेगडी नाती
तहहयात माझे निशाण शुभ्र, (तहाचे),
बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!
मस्त…. आशय तर एकदम मस्त.
ReplyDeleteआणि त्याबरोबर आणखी आवडलेली एक गोष्ट.
बर्याच गझलांमध्ये आढळणारी ’आहे/नाही’ अशी
क्रीयापदांच्या रूपातली यमकं न वापरता ‘माती’,
‘जाती’, ‘सांगाती’, ‘नाती’, ‘हाती’ अशी
यमकं वापरल्यामुळे रंगत वाढली आहे.
(यमक हा कवितेतला शब्द, गझलेच्या संदर्भात वापरलाय.
तो बरोबर की चूक हे मला माहिती नाही.)
प्रत्येक पावलागणिक बेट काट्यांचे,
ReplyDeleteमाझीच पैंजणे दगा देउनी जाती
-वा वा. एकूण गझल आवडली.