कधी चांदण्याला तुझी आस होती
कधी श्रावणाला तुझे ध्यास होते
मला मात्र जन्मांतरी सोबतीला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
निजेच्या क्षणी जोजवाया मनाला
तुझे शब्द होते, तुझे सूर होते
पहाटे जशी जाग आली, उशाला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
गळा हुंदका दाटता सावराया
तुझा स्पर्श होता, तुझे हास्य होते
जरा एकटे वाटता साथ द्याया
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
फुलांना तजेला, कळ्यांच्या खळ्यांना
हसू वाटणारा तुझा गंध होता
झर्याला खळाळून लोभावणारे
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता
दिली साथ आयुष्यगीतास ज्यांनी,
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
कधी श्रावणाला तुझे ध्यास होते
मला मात्र जन्मांतरी सोबतीला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
निजेच्या क्षणी जोजवाया मनाला
तुझे शब्द होते, तुझे सूर होते
पहाटे जशी जाग आली, उशाला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
गळा हुंदका दाटता सावराया
तुझा स्पर्श होता, तुझे हास्य होते
जरा एकटे वाटता साथ द्याया
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
फुलांना तजेला, कळ्यांच्या खळ्यांना
हसू वाटणारा तुझा गंध होता
झर्याला खळाळून लोभावणारे
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता
दिली साथ आयुष्यगीतास ज्यांनी,
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
क्रांतिताई, अतिशय सुंदर कविता.. शब्दयोजना, मीटर, गेयता सर्व काही दाद देण्यासारखं... अर्थात आपल्या लौकिकाला साजेसंच.. :)
ReplyDeleteकधी चांदण्याला तुझी आस होती
ReplyDeleteकधी श्रावणाला तुझे ध्यास होते
मला मात्र जन्मांतरी सोबतीला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
अतिशय सुंदर ! खूपच सुंदर ...
फुलांना तजेला, कळ्यांच्या खळ्यांना
हसू वाटणारा तुझा गंध होता
झर्याला खळाळून लोभावणारे
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता
अप्रतिम, खूप सुंदर कल्पना आणि प्रतिमा ह्यांवर जीव ओवाळून टाकावा खरच...
नेहमीप्रमाणेच सुंदर कविता.
ReplyDelete“निजेच्या क्षणी ……. तुझे भास होते”
हे सर्वात जास्त आवडलं.