ऋतू भेटायचे झाले कमी,
उद्यासाठी करावी बेगमी!
तुझ्यापासून लपवावे कसे?
तुला सांगू कसे सारेच मी?
जराशी ऊब श्वासांची हवी,
किती सोसू कडाके नेहमी?
रुचेना एकदाही का तुला?
कितीदा तोच मांडू खेळ मी?
तुझ्यावाचून मी नाही कुणी,
तुझ्यासाठी, तुझी आहेच मी!
कधीची गुंतली आहे, पुन्हा
नको टाकूस जाळे रेशमी
हवे ते स्वप्न मी देते तुला,
उरी जपशील त्याला, दे हमी!
अप्रतिम !
ReplyDeleteखूप खूप सुंदर !
तुझ्यापासून लपवावे कसे?
तुला सांगू कसे सारेच मी?
ह्या ओळी खूप आवडल्या...
अप्रतिम... सगलेच शेर अप्रतिम आहेत...
ReplyDelete