Thursday, July 14, 2011

वाटा भुलावणाऱ्या

वाटा भुलावणाऱ्या तू टाळ पावसाच्या 
नादी नकोस लागू ओढाळ पावसाच्या 

रेशीमधार झिरमिर पडद्यातला पिसारा 
दारी फुलून आला वेल्हाळ पावसाच्या 

मी ओंजळीत गोळा केली फुले सरींची 
केसांमध्ये लडी तूही माळ पावसाच्या

दाटून गच्च येते, काळे क्षणात होते 
संमोहनात येते आभाळ पावसाच्या

गाठून एकटीला भिजवून चिंब केले,
खोड्या तरी किती या नाठाळ पावसाच्या!

काचेवरील चित्रे थेंबांत रंगलेली,
वेड्या कलाकृती या सांभाळ पावसाच्या 

1 comment:

  1. छान गजल.

    "दाटून गच्च येते, काळे क्षणात होते
    संमोहनात येते आभाळ पावसाच्या "
    ही एकदम वेगळीच कल्पना .... फार आवडली

    ReplyDelete