कटू बोलला तो, तसे फार नाही
जिव्हारी रुतावा, असा वार नाही
जरी मागते मी, मला खंत नाही,
इथे सांग ना, कोण लाचार नाही?
उसासू नको तू, तुझ्या आठवांचा
उदासीत माझ्या पुढाकार नाही !
करू काय मी या मुक्या पावसाचे?
तुझ्यासारखा तो धुवांधार नाही!
तुझे दु:ख आले तिच्या सोबतीला,
व्यथा आज माझी निराधार नाही
दशांशात भागून शून्यात बाकी,
सुखाच्या नशीबी गुणाकार नाही!
जिव्हारी रुतावा, असा वार नाही
जरी मागते मी, मला खंत नाही,
इथे सांग ना, कोण लाचार नाही?
उसासू नको तू, तुझ्या आठवांचा
उदासीत माझ्या पुढाकार नाही !
करू काय मी या मुक्या पावसाचे?
तुझ्यासारखा तो धुवांधार नाही!
तुझे दु:ख आले तिच्या सोबतीला,
व्यथा आज माझी निराधार नाही
दशांशात भागून शून्यात बाकी,
सुखाच्या नशीबी गुणाकार नाही!
करू काय मी या मुक्या पावसाचे
ReplyDeleteतुझ्यासारखा तो धुंवाधार नाही
..... खूप छान.... ओघवती गझल
छान.
ReplyDeleteदशांशात भागून शून्यात बाकी,
ReplyDeleteसुखाच्या नशीबी गुणाकार नाही
:) sundar !!