Saturday, December 3, 2011

भूमिका

नव्हतेच मुळी मी येथे हा पडदा उठतानाही
अन् पडद्यामागे होते पडदा पडला तेव्हाही
टाळयांवर पडल्या टाळ्या, कौतुकात नाटक सरले
अन् मुख्य भूमिका माझी होती, हे तेव्हा कळले !

हे विचित्र नाटक, ज्याला नाट्याचा गंधहि नव्हता
मी गुंतुन जाण्याजोगा थोडासा बंधहि नव्हता
मी नसतानाही माझ्या नावावर होते चढले
माझ्याविन सर्वांना ते रुचले, पटले, उलगडले

'हे निर्विवाद यश माझे' दिग्दर्शक असे समजला
'ही दाद संहितेसाठी' लेखक या भ्रमात रमला
बोलले समीक्षक, 'अवघे नाटक पुरते भरकटले'
(अन् मुख्य नाट्य होते ते पडद्याच्या आडच घडले!)

2 comments:

  1. मस्तच ......
    शेवटचं कडवं आणि त्यातली शेवटची ओळ .... जबरदस्त.

    ReplyDelete