कुणा माहिती काल होतो कसा ?
मला मीच ना आठवे फारसा !
प्रवाहातल्या ओंडक्यासारखा
किती दूर वाहून आलो असा
दगा देतसे सावलीही मला
भरोसा करावा कुणाचा कसा ?
खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !
खरा चेहरा दाखवू पाहता
चरे पाडले, फेकला आरसा
नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा ?
उतूही नये जीव, मातू नये
फुलावा, फळावा असा दे वसा !
मला मीच ना आठवे फारसा !
प्रवाहातल्या ओंडक्यासारखा
किती दूर वाहून आलो असा
दगा देतसे सावलीही मला
भरोसा करावा कुणाचा कसा ?
खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !
खरा चेहरा दाखवू पाहता
चरे पाडले, फेकला आरसा
नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा ?
उतूही नये जीव, मातू नये
फुलावा, फळावा असा दे वसा !
छान .... अगदी सहजतेने उतरलेली
ReplyDelete"खुळ्या पावसाच्या ....." हे फार आवडलं.