त्याने जे जे सांगितले ते करून झाले
वा-याशी लावून शर्यती फिरून झाले
ज्यांनी माझी साथ दिली ते परके होते,
झाले तितके विरोध सारे घरून झाले
माघारीचे पाउल पहिले कुणि उचलावे ?
त्याचे माझे वाद एवढ्यावरून झाले
काटयांतहि फुलण्याचा त्याने वसा दिलेला,
झाले बहरुन पुन्हा, पुन्हा मोहरून झाले
काहीही दिसले नाही, जे नकोच होते,
आठवणींचे कपाटही आवरून झाले
आता सावर केवळ थकल्या श्रांत जिवाला,
कोसळणारे डोलारे सावरून झाले
अगदी झक्कास झाली आहे गझल...
ReplyDelete"झाले तितके विरोध सारे घरून झाले" यावरून "हमें तो अपनोंने लुटा दिया, गैरोमें कहा दम था" ची आठवण झाली :)
ज्यांनी माझी साथ दिली ते परके होते,
ReplyDeleteझाले तितके विरोध सारे घरून झाले