संहिता जुनी नवीन अर्थ मागते
अन्यथा विसर्जनास गर्त मागते
आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)
कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते
तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ मागते?
स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते
क्या बात है!!!
ReplyDeleteखूपच सुंदर!! मजा आली !!!
क्रान्ति, एक वेगळाच दृष्टिकोन मांडलास. आवडली.
ReplyDeleteआज कोणत्या अटीत गुंतणार मी?
ReplyDelete(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)
छान.
तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ मागते?
ह्यावरून अनिल कांबळींच्या श्रीधर फडके ह्यांनी गायलेल्या गज़लेतील शेर आठवला :
"थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी"