तुझ्या श्वासांचा विळखा
तुझ्या नजरेची मिठी
तुला पाहता लाजून
झुके पावलांशी दिठी
तुझे मौनही बोलके,
गूज डोळ्यांनी सांगते
भाव जाणून त्यातले
गीत मनात रंगते
दुराव्यात जवळीक
जपणारी तुझी प्रीत
तिचा अनाहत नाद,
तिचे स्वर्गीय संगीत
तिची अवीट माधुरी
स्वप्न जागवी बिलोरी
तुझी क्षणांची संगत
माझी जन्माची शिदोरी
सहज म्हणून विचारते - यमक असणा-या ओळी जास्त का तालबद्ध वाटतात? असे मलाच वाटते की सगळयांना वाटते- हे अर्थातच मला माहिती नाही. ’व्यक्ती तितक्या प्रकृती’ हेच याचे कदाचित उत्तर असेल.
ReplyDeleteतिची अवीट माधुरी
ReplyDeleteस्वप्न जागवी बिलोरी
तुझी क्षणांची संगत
माझी जन्माची शिदोरी
सुंदर कविता
सुरेखच जमलीय.
‘अग्निसखा’ च्या कविता
ReplyDeleteकाव्यानंदाची शिदोरी