Wednesday, November 10, 2010

पापण्यांना भार झाली आसवे

चांदणेही ढाळते माझ्यासवे
पापण्यांना भार झाली आसवे

मी कधी त्याचीच होते, अन् अता,
नावही माझे न त्याला आठवे

वेदना माझ्या किती मी साहिल्या,
आज का त्याची व्यथा ना साहवे?

सांग ना हा कोणता आला ऋतू?
अंतरी आशा नव्याने पालवे

जा, मला बोलायचे नाही सख्या,
[बोलल्यावाचूनही ना राहवे!]

5 comments:

  1. सुपर्ब! सुरूवातीच्या दोन ओळी वाचताना ताल पकडता आला नाही, अडखळले. मग लक्षात आला. ठेका नवीन वाटला जरा.

    ReplyDelete
  2. चांदणेही ढाळते माझ्यासवे
    पापण्यांना भार झाली आसवे

    aawadalee

    ReplyDelete
  3. धन्यवाद कांचन आणि बंड्या.कांचन, ही "ऒर्कुट गज़ल" आहे! तिथे मराठी कविता या कम्युनिटीवर दिलेल्या ओळीवर कविता किंवा गझल लिहायची असते, त्यात प्रथमच "पापण्यांना भार झाली आसवे" या ओळीवर लिहिलेली आहे ही. :)

    ReplyDelete
  4. वा! एका ओळीवर तू इतकी सुंदर गझल लिहिलीस?! कमाल आहे तुझी.

    ReplyDelete