Sunday, November 21, 2010

त्रिधारा - आठवणी

त्रिधारा - आठवणी

* आठवणींचे शंखशिंपले
बालपणीच्या नदीकिनारी
मोठेपण विसरून वेचले!

* थंडी मरणाची, गोठले आभाळ,
जात्या जिवासाठी आता हवी आई
तुझ्या आठवांची उबदार शाल!

* काचाकवड्या, सागरगोटे,
आठवणींचे खेळ रंगता
प्रौढत्वाला हेवा वाटे!

* आठवणींच्या पडद्याआडून
एक निरागस, लोभस चेहरा,
मलाच शोधतोय लपून-छपून!

* आठवणींचे किरण कोवळे
भल्या पहाटे जागविती अन्
आठवणींतच सांज मावळे!

1 comment:

 1. मस्त त्रिवेण्या.
  मी मुंबईकर असलो तरी,
  “काचाकवड्या, सागरगोटे,
  आठवणींचे खेळ रंगता
  प्रौढत्वाला हेवा वाटे!”

  या त्रिवेणीला तर अगदी
  पुणेरी नेटकरांसारखी दाद द्यावीशी वाटते….
  ...... लय भारी !!!!

  ReplyDelete