Sunday, October 25, 2009

अज्ञात

अज्ञाताच्या प्रवासातल्या धूसर धूसर वाटेवर
अकल्पिताच्या गूढ़ प्रदेशी मला खुणविते माझे घर


उन्हात भिजला श्रावण हसतो, गहि-या डोहावर झरतो,
सारंगाच्या घेत लकेरी, तनमन भिजवी हलकी सर

निळाशार हा शांत जलाशय, इंद्रधनूचे रंग नभी,
हलके हलके नाव डोलते चमचमणा-या लाटेवर

गहन, अनाकलनीय दिशांच्या आवर्तातुन फिरताना
धुक्यात हरवुन जाते मीही भिरभिरणा-या वा-यावर

ओढ अनावर कुठे नेतसे अंतराळ भेदून मला?
अखंड का हे झुरणे अन फिरणे स्वप्नांच्या वाटेवर?

3 comments:

  1. अखंड का हे झुरणे अन फिरणे स्वप्नांच्या वाटेवर?
    sundarach

    ReplyDelete
  2. 'अब्द'च्या 'मैत्र'परिवारात सामील झाल्याबद्दल आभार व स्वागत. सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

    ReplyDelete