माझे माझे किती म्हणावे? जाताना नेणार काय मी?
काहीही ना जगात माझे, कोणाला देणार काय मी?
देण्यासाठी तुझे हात अन् मी घेण्यासाठीच जन्मले,
माझ्यासाठी तुला मागते, तुझ्याविना घेणार काय मी?
जाण्याआधी चुकती केली जन्मभराची सारी देणी,
काही वचने, शपथा उरल्या, पुन्हा इथे येणार काय मी?
देता-घेता जीवन सरले, दिले-घेतले इथेच विरले
मुठी झाकल्या, रित्या ओंजळी, दिले काय? घेणार काय मी?
जाता जाता तुझ्या अंगणी शब्दांचा प्राजक्त लावते,
तीच संपदा माझ्या हाती, तुला दुजे देणार काय मी?
सुंदर.
ReplyDeleteकाही वचने, शपथा उरल्या
दिले-घेतल इथेच विरले
रित्या ओंजळी, दिले काय?....खरेच ग.भावले.
Apratim!!!
ReplyDelete