Tuesday, October 27, 2009

मनाला

धरू कसे बेबंद मनाला?
नकोच होते पंख मनाला!

इथे-तिथे फिरते, भरकटते
कसा नसे निर्बंध मनाला?


दिले तुझ्या प्राजक्तफुलांनी
नव्या ऋतूचे रंग मनाला


सळाळणा-या रात्रनागिणी,
अन् स्मरणांचे दंश मनाला


तिथे तुझी लाटांवर होडी,
इथे छळे आतंक मनाला


कसे, कधी तू सांग वाचले
खळाळत्या स्वच्छंद मनाला?


अजून छळती कधीकाळच्या
जुन्या चुकांचे डंख मनाला


खुणावती वाटा परतीच्या,
अता करू नि:संग मनाला!

3 comments:

  1. "ajun chalati kdhikalchay, junya chukanche dankh manala" Sureks!!

    ReplyDelete
  2. सळाळणा-या रात्रनागिणी,
    अन् स्मरणांचे दंश मनाला


    वा! गझल आवडली.

    ReplyDelete
  3. मन निःसंग झाल तर त्यासारखी ’अजब’ दुसरी गोष्ट नसेल! मस्त आहे कविता.

    ReplyDelete