Wednesday, July 15, 2009

मला

बांध बंधनात मला
ऐक स्पंदनात मला

जडवुन घे मानसिच्या
रत्नकोंदणात मला

वेढतात सूर तुझे
मालकौंस गात मला

दे दंवात भिजलेली
रिमझिमती रात मला

जग फसवे, हे चकवे
छळती दिनरात मला

प्रीत लपेटून तुझी
ठेव काळजात मला

भिजुन चिंब होऊ दे
रंगपावसात मला

कुंचले नको नुसते,
दे तुझेच हात मला

2 comments:

  1. मस्त. या कवितेचा रिदमसुद्धा खूप आवडला.

    ReplyDelete
  2. वा वा फारच छान.

    माझे मी न उरावे
    विरघळू दे तुझ्यांत
    मला

    ReplyDelete