मी दिवस मोजते सरते
पण जगणे मात्र विसरते
तू इतरांसाठी झटसी,
मी माझ्यापुरती उरते
कितिही तू दिले तरीही
ते मला कसे ना पुरते ?
जे मला न मागुन मिळते
तितक्याने मन ना भरते
का हाव ? कशी अतृप्ती ?
मिळुनही सर्व मी झुरते
तू देउन विसरून जाशी,
मी घेउन दान विसरते
>>का हाव ? कशी अतृप्ती ?
ReplyDelete>>मिळुनही सर्व मी झुरते
>>तू देउन विसरून जाशी,
>>मी घेउन दान विसरते
हे अगदी १००% जुळतं.