Saturday, December 5, 2009

काजवा

कसा कातरवेळेला घुमे मनाचा पारवा
हवे आभाळ मुठीत, चंद्र ओंजळीत हवा

किलबिलणारी सांज, ओढ मनी कोटराची,
निळ्या नभाचे गोंदण, तसा पाखरांचा थवा

वृंदावनात तुळस, मंजि-यांची दाट नक्षी
प्रकाशाची फुले झाली, उजळता सांजदिवा

वेल जाईची सजली चांदण्यांच्या बहराने,
मस्त गंधाच्या धुंदीत निशिगंधाचा ताटवा

देव्हा-यातल्या ज्योतीने घरदार प्रकाशले,
मन माझे उजळतो तुझ्या भासाचा काजवा

1 comment:

  1. देव्हा~यातल्या ज्योतीने घरदार प्रकाशले,
    मन माझे उजळतो तुझ्या भासाचा काजवा..... क्या बात है!
    वेल जाईची ही सुंदर आहे....गंध दरवळला गं मनात.

    ReplyDelete