आज अचानक जागी झाली
कधीतरी निजलेली गाणी
सांजवात होऊन तेवली
मनातली विझलेली गाणी ||
दबले, बुजले, घुसमटलेले
सूर विजेसम लख्ख चमकले,
घन बरसावे तशी बरसली
कंठातच थिजलेली गाणी ||
भुरभुरता पाऊस कोवळा
संध्यारंगातून झिरपला,
किरणांच्या छायेत उतरली
थेंबांवर सजलेली गाणी ||
नवथर मातीच्या ओलेत्या
देहाच्या परिमलात घुमली,
दरवळली अन तिच्या कुशीतुन
कोंबांसह रुजलेली गाणी ||
निळेसावळे ओले अंगण,
तुझ्या नि माझ्या मनात श्रावण,
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी ||
असाच अवखळ पाउस होता,
अन उडणारी एकच छत्री,
आठवली का हळूच माझ्या
कानी कुजबुजलेली गाणी?
सुंदर रचना
ReplyDeleteअप्रतिम, क्रांती.. !!
ReplyDeleteसुंदर, आशयघन, सहज आणि ’आतून’ स्फुरलेली कविता.
ReplyDeleteखूप आवडली. मन अगदी Fresh करून गेली.
कविता ’मायबोली’ वर वाचली.
परंतु मी तिथे अभिप्राय क्वचितच देतो.
कारण या क्षेत्रात मी खूपच नवखा
(जेमतेम रांगणारा) माणूस आहे.
तुमची ही कविता वाचल्यावर अभिप्राय
दिल्यावाचून रहावल नाही म्हणून
तुमचा blog शोधून काढला.
blog वरील इतर कविताही वाचायची
इच्छा आहे. सवडीनुसार वाचून अभिप्राय देईन.
गेले काही महिने अशा कविता net वर
ReplyDeleteशोधून वाचायचा मला छंद जडला आहे.
क्वचितच सापडतात अशा सुंदर कविता.
अनेकदा निराशाच पदरी पडते.
(कदाचित मी देखील असच लिहित असेन ?!)
त्यामुळे कधी कधी मन विषण्ण होत.
काही कवितांच्या बाबतीत सदर रचनेला
कविता म्हणायला मन धजावत नाही,
तर काही कविता ’शास्त्रीय संगीता’ प्रमाणे
डोक्यावरून जातात.
ही विषण्णता मी माझ्या blog वर अभिव्यक्त
केली आहे. वेळ मिळाल्यास वाचावी.
blog वर इतरही काही कविता/लेखन आहे.
त्याबाबत स्पष्ट परखड समीक्षा/अभिप्राय
दिल्यास मी उपकृत होईन.
Blog-link
http://ulhasbhidesanchit.blogspot.com/
उल्हास भिडे (बोरिवली-मुंबई)
ulhasbhide@gmail.com
सुंदर कविता. अभिनंदन.
ReplyDeleteआपल्या या सहजसुंदर रचनेला काही उपमाच देता येत नाही - अनुपमेय !
ReplyDeleteसुंदर कविता हरवून गेली ?
या इथेच अवचित मिळून गेली !
ओघवती पण रसाळ भाषा
सहजसुंदर उपमा त्या साध्या
काव्यघन सुखदसा बरसून जाई
रसिक हृदय चिंबचिंबसे होई
शशांक