Wednesday, July 21, 2010

अरूपाचे रूप

अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप
पाहता तद्रूप | जीव होई


भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी
उभा जगजेठी | पंढरीत


दीनांचा कैवारी | सावळा मुरारी
संकटात तारी | पांडुरंग


भाव तेथे देव | नांदतो सदैव
कैवल्याची ठेव | अंतरात


मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता
रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन

1 comment:

  1. क्रान्ति, सलाम! हे भन्नाट आहे. वाचून रोमांच उभे राहिले. तुला खरोखरंच देवी सरस्वतीचं वरदान लाभलं आहे. मन:पूर्वक शुभेच्छा!

    ReplyDelete