तुझ्या सावलीला तुझे रूप द्यावे
तुझे स्वप्न देहात गोंदून घ्यावे ॥
मनोमंदिरी या तुला पाहते मी
नसे फूल तेव्हा मला वाहते मी
मना हेच ठावे, तुला नित्य ध्यावे ॥
उषेच्या कपोली प्रियाचीच लाली
तुझ्या चाहुलींचा तसा रंग गाली
अलंकार नाही, तुझे भास ल्यावे ॥
फुलांनी टिपावे सुखाच्या कणांना
जिथे मी जपावे सुगंधी क्षणांना
अशा स्वप्नलोकी मला तूच न्यावे ॥
नसावी तिथे बंधने या जगाची
झणी तृप्त व्हावी तृषा ही युगाची
सुधेने सुधेलाच आकंठ प्यावे ॥
अतिशय उत्कृष्ठ!
ReplyDeleteअप्रतिम !
खूप खूप आवडली...
नसे फूल तेव्हा मला वाहते मी...अतिशय सुंदर !
तुझ्या चाहुलींचा तसा रंग गाली
अलंकार नाही, तुझे भास ल्यावे ॥
... खूप छान !
Khoop chaan..
ReplyDelete"फुलांनी टिपावे सुखाच्या कणांना
ReplyDeleteजिथे मी जपावे सुगंधी क्षणांना
अशा स्वप्नलोकी मला तूच न्यावे ॥"
....... अतिशय सुंदर
Tooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo
ReplyDeletegood!
kuDos!
अतिशय सुन्दर रचना..
ReplyDelete