तुला न मी पाहिले तरीही मनात श्रद्धा अपार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
सदैव काट्यांत गुंतलेल्या, उजाडलेल्या विराण बागा
अजाणता मोहरून आल्या, तुझ्यामुळे ही बहार आहे!
अजाणता मोहरून आल्या, तुझ्यामुळे ही बहार आहे!
तुझ्या मनाच्या जुन्या व्रणांनी कसे भरावे? कसे सुकावे?
अजून तो बोलतोच, त्याच्या हरेक शब्दास धार आहे
अजून तो बोलतोच, त्याच्या हरेक शब्दास धार आहे
मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!
मला जराही कळू न देता लुटून नेलेस गाव माझे,
पिसाट दैवा, तुझ्या छडीचा अखेरचा हा प्रहार आहे
पिसाट दैवा, तुझ्या छडीचा अखेरचा हा प्रहार आहे
कसे, किती शोधले, कुठेही तपास ज्याचा नसे कुणाला,
असा निराकार सावळा श्रीहरी मला भेटणार आहे!
असा निराकार सावळा श्रीहरी मला भेटणार आहे!
"तुझ्या मनाच्या जुन्या व्रणांनी कसे भरावे? कसे सुकावे?
ReplyDeleteअजून तो बोलतोच, त्याच्या हरेक शब्दास धार आहे"
..... हृदयस्पर्शी
खूप सुंदर !
ReplyDelete