ओल्या सुरावटींच्या संमोहनात आहे
ग्रीष्मातही खुळी मी मल्हार गात आहे
माझेच सूर त्याला सांभाळता न आले
गंधार छेडते मी, तो धैवतात आहे !
बेसूर फक्त नाही, बेताल मी, तरीही
जिंकेन मैफली या वेड्या भ्रमात आहे
वेडी अबोल आशा देते उगा दिलासा,
'कंठात शोधसी का? गाणे मनात आहे'
संवादिनीस माझ्या नाहीच वर्ज्य काही
षड्जास टाळण्याचा त्याचा प्रघात आहे
गाता जरी न आले, हेही कमी न झाले
नाते तरी सुरांशी जोडून जात आहे
'मैफल सरेल आता, जा, भैरवी तरी गा'
आदेश हा कुणाचा? मी संभ्रमात आहे
ग्रीष्मातही खुळी मी मल्हार गात आहे
माझेच सूर त्याला सांभाळता न आले
गंधार छेडते मी, तो धैवतात आहे !
बेसूर फक्त नाही, बेताल मी, तरीही
जिंकेन मैफली या वेड्या भ्रमात आहे
वेडी अबोल आशा देते उगा दिलासा,
'कंठात शोधसी का? गाणे मनात आहे'
संवादिनीस माझ्या नाहीच वर्ज्य काही
षड्जास टाळण्याचा त्याचा प्रघात आहे
गाता जरी न आले, हेही कमी न झाले
नाते तरी सुरांशी जोडून जात आहे
'मैफल सरेल आता, जा, भैरवी तरी गा'
आदेश हा कुणाचा? मी संभ्रमात आहे
sundar...
ReplyDeleteapratim !!
ReplyDeleteसगळेच शेर एकसे एक सुंदर.
ReplyDeleteअर्थात शेवटचा शेर (मक्ता म्हणतात ना याला ?)
सर्वांवर कळस...... ग्रेट
अतिशय सुंदर ..अप्रतिम.
ReplyDeleteमन:पूर्वक धन्यवाद.
ReplyDelete