आज त्याला पाहण्याचा योग होता
संचिताच्या पारण्याचा योग होता
ऐन मध्यान्हीच यावा चंद्र दारी ?
पौर्णिमेने लाजण्याचा योग होता
भाग्य माझे थोर, माझ्या वाळवंटी
हर्षगंगा वाहण्याचा योग होता
बिंब माझे पाहता नजरेत त्याच्या,
मी स्वतःवर भाळण्याचा योग होता
आस होती थेंब स्वातीचा मिळावा,
अमृताने नाहण्याचा योग होता !
भेट नवलाची खरी की स्वप्न माझे?
अद्भुताने भारण्याचा योग होता
कल्पनेचा खेळ मोठा रंगलेला,
संपला तो, जागण्याचा योग होता
संचिताच्या पारण्याचा योग होता
ऐन मध्यान्हीच यावा चंद्र दारी ?
पौर्णिमेने लाजण्याचा योग होता
भाग्य माझे थोर, माझ्या वाळवंटी
हर्षगंगा वाहण्याचा योग होता
बिंब माझे पाहता नजरेत त्याच्या,
मी स्वतःवर भाळण्याचा योग होता
आस होती थेंब स्वातीचा मिळावा,
अमृताने नाहण्याचा योग होता !
भेट नवलाची खरी की स्वप्न माझे?
अद्भुताने भारण्याचा योग होता
कल्पनेचा खेळ मोठा रंगलेला,
संपला तो, जागण्याचा योग होता
छान गझल.
ReplyDelete"बिंब माझे ...." हा शेर खूप आवडला.
स्वत:वर भाळणे ही कल्पना अफाट.