Monday, May 7, 2012

मावळायचे.....

जरा पुढे वळायचे, 
वळून मावळायचे 

तुला उजेड द्यायला 
मलाच ना जळायचे? 

पहा, भिजेल पापणी 
जपून ओघळायचे!

तुझ्यात काय गोडवा,
तुला कसे कळायचे?

परस्परांत गुंतलो,
कुणी कुणा छळायचे?

जिथे-तिथे तुझ्या खुणा,
किती, कुठे पळायचे?

जिथून वेचशील तू,
तिथे मला गळायचे! 

2 comments:

  1. पहा, भिजेल पापणी
    जपून ओघळायचे! ..
    --
    संपूर्ण गझल आवडली..

    ReplyDelete